|
भरूच (गुजरात) : येथे मुसलमानबहुल इखर गावातील स्थानिक हिंदु समाजाला तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी या हिंदूंनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. यात न्याय देण्यासहित संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.
१. या प्रकरणी नवरात्रोत्सवाचे आयोजक शैलेश वसावा यांनी सांगितले की, प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही आम्ही नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी गावामध्ये स्वच्छता चालू होती. त्या वेळी शेजारी रहाणारे मोहसिन अली खान पठान आणि अली हसन पठान आले आणि आम्हाला शिवीगाळ करू लागले. आम्ही त्यांना म्हटले, ‘आपण एकत्र गावात रहातो, तर तुम्ही असे का वागत आहात ?’ त्यावर ते म्हणाले, ‘कुणाला बोलवायचे असेल, तर त्यांना बोलवा. हा आमचा भाग आहे. आम्ही तुम्हाला येथे नवरात्रोत्सव साजरा करू देणार नाही. जर तुम्ही येथे गरबा खेळलात, तर आम्ही मंडप मोडून टाकू, दगडफेक करू’, अशी धमकी दिली. या गावात अन्यत्र उत्सव साजरा करण्यासाठी मोकळी जागाही नाही.
२. शैलेश वसावा यांनी पुढे म्हटले की, असे पहिल्यांदा झालेले नाही. यापूर्वी अनेक वेळा आम्हाला अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. एकदा त्यांनी (धर्मांध मुसलमानांनी) जेथे गरबा आणि दिवा लावण्यात येतो ते स्थान तोडून टाकले होते. आम्ही तक्रार केली नव्हती; कारण आम्हाला त्यांच्या समवेतच येथे रहायचे आहे. आमच्या प्रत्येक उत्सवाच्या वेळी ते अडथळे निर्माण करतात. स्थानिक हिंदु महिलांशी त्यांनी अनेकदा अश्लील वर्तणूक केली आहे. मुसलमान बहुसंख्य असल्याने आम्ही काही करू शकत नाही. त्यांच्या धमकीमुळे आम्ही चिंतित आहोत. (इतकी वर्षे असे प्रकार चालू आहेत आणि हिंदू ते सहन करतात, हे लज्जास्पद ! – संपादक) भविष्यात ते आमची हानी करू शकतात. प्रशासनाकडे आमची मागणी आहे की, आम्हाला संरक्षण आणि न्याय द्यावा.
३. या घटनेमुळे भरूचमधील वीर बिरसा ब्रिगेड आणि अन्य काही संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|