|
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे काही दिवसांपूर्वी ‘द यंग थिंकर्स फोरम’ नावाच्या संघटनेने पाचवे वार्षिक ‘यंग थिंकर्स कॉनक्लेव्ह’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. येथील प्रथितयश ‘नॅशलन लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी’मध्ये आयोजित कार्यक्रमाला काही साम्यवादी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. कार्यक्रमाला प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि अभ्यासक श्री. नीरज अत्री संबोधित करणार असल्याने हा विरोध झाला. या वेळी आयोजकांनी साम्यवाद्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्याची सिद्धताही दर्शवली; परंतु त्यासाठी साम्यवादी सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे कोणत्याही विरोधाला न जुमानता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
१. नीरज अत्री यांच्यासमवेत प्रखर हिंदुत्वनिष्ठ रश्मी सामंत, प्रा. राम शर्मा, पत्रकार स्वाती गोयल शर्मा आणि अन्य काही राष्ट्रनिष्ठांनीही संबोधित केले. याला महाविद्यालयातील साम्यवादी ‘सर्व व्याख्याते हे द्वेष पसरवणारे आहेत’, अशा प्रकारे निराधार आरोप करत होते.
They wanted the @YTFbhopal to ban author Neeraj Atri, citing his old critical tweets about Abrahamic religions.
Rashmi Samant, who was invited as a Speaker at the event, informed, “There was a small radical faction which was tearing posters and banners with the speakers’ names…
— OpIndia.com (@OpIndia_com) October 3, 2023
२. कार्यक्रमामध्ये एकूण ६ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यांतील ‘कट्टरतावादापासून धर्मापर्यंत : पैगंबरी एकेश्वरवादासंदर्भात हिंदु दृष्टीकोन’ (फ्रॉम डॉगमा टू धर्मा : हिंदु व्ह्यू ऑफ प्रोफेटिक मोनोथिझम्’ आणि ‘वोकिझम’ चळवळीचा भांडाफोड : सामाजिक सक्रियतेचे परीक्षण’ (अनरॅव्हेलिंग वोकिझम् : एक्झॅमिनिंग द डीएन्ए ऑफ सोशल एक्टिविझम्’ या सत्रांना विशेषकरून विरोध करण्यात आला. ‘वोकिझम्’ ही विकृत चळवळ असून ही प्रसृत करणारे लोक स्वत: ‘सामाजिक न्याय’ आणि ‘राजकीय समस्या’ यांविषयी अत्यंत प्रगल्भता बाळगत असल्याचा आव आणतात ! हे लोक ‘सामाजिक अन्यायाच्या विरोधात आम्ही जागे झालो आहोत’, असे दाखवतात.
३. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने झालेल्या विरोधावर मार्ग काढण्याकरिता ‘साम्यवाद्यांना त्यांचे आक्षेप मांडण्यासाठी ‘चर्चासत्रा’चे आयोजन करून व्यासपीठ मिळवून देतो’, असे म्हटले; परंतु विरोधक ‘अत्री यांनी कोणत्याही परिस्थितीत विषय मांडायला नको’, यावरच अडून होते. शेवटी त्यांच्या विरोधाला न जुमानता कार्यक्रम घेण्यात आला.
४. रश्मी सामंत यांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून सांगितले की, कट्टरतावाद्यांचा एक ‘छोटा गट’ कार्यक्रमाला संबोधन करणार्यांची नावे लिहिलेली भित्तीपत्रके आणि फलक फाडत होते. प्रत्यक्ष घडलेल्या वस्तूस्थितीच्या संदर्भात वाद-विवाद करण्यापेक्षा या गटाला गुंडगिरी, हिंसा आणि तोडफोड करायची होती. (एरव्ही ‘लोकशाहीचा आवाज घोटला जातो’, अशा प्रकारे हिंदूंवर निराधार आरोप करणारे साम्यवादी स्वत: मात्र लोकशाहीविरोधी मार्गांचा अवलंब करतांना वारंवार दिसतात. त्यामुळे ‘साम्यवादीच कशा प्रकारे लोकशाहीची हत्या करत आहेत’, हे जगाला सांगण्याची आता वेळ आली आहे. – संपादक)
५. कार्यक्रमाच्या वेळी ‘जिझस क्राईस्ट : अॅन आर्टिफाईस फॉर अॅग्रेशन’, ‘टिपू सुल्तान : व्हिलन ऑर हीरो ?’, ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘जिहाद’ या पुस्तकांची विक्री चालू होती. यासही त्यांनी विरोध दर्शवला.
६. या कार्यक्रमाला ‘एक्स’वरूनही साम्यवाद्यांच्या गटांनी विरोध केला. तसेच ‘द वायर’ आणि ‘द क्विंट’ या हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या वृत्तसंकेतस्थळांनीही या कार्यक्रमाच्या विरोधात द्वेषपूर्ण लेख लिहिले. (यातून साम्यवाद्यांची ‘इकोसिस्टम’ (सर्व स्तरांवर त्यांची विचारसरणी असलेले लोक/आस्थापने यांचा समूह कशा प्रकारे कार्यरत आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
‘कँसल कल्चर’ला न जुमानता पूर्ण निष्ठेने हिंदूंनी त्यांचे विचार मांडत रहायला हवा ! – नीरज अत्री(हिंदुत्वनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ यांनी आयोजित कार्यक्रमाला विविध माध्यमांतून विरोध करून तो बंद पाडण्याच्या समाजविघातक चळवळींना ‘कँसल कल्चर’ म्हणतात.) या कार्यक्रमासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने श्री. नीरज अत्री यांना संपर्क साधला. श्री. अत्री कार्यक्रमाचे परीक्षक होते. ‘ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म यांविषयीची ‘हिंदु’दृष्टी’ या विषयावर त्यांनी त्यांचे विचार मांडले. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना ते म्हणाले की, मी ‘इस्लामचा द्वेष करणारा आहे’, असे सांगत साम्यवादी मला विरोध करत होते. साम्यवादी आणि हिंदुविरोधक यांच्या ‘कँसल कल्चर’ला न जुमानता पूर्ण निष्ठेने हिंदूंनी त्यांचे विचार मांडत रहायला हवे. ‘वाद-विवाद’ करण्याची आपली परंपराच राहिली आहे. संवादाच्या माध्यमातून आपण यासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे आणि प्रखरतेने आपला विचार प्रसृत करायला हवा.’ |
संपादकीय भूमिका
|