उडुपी (कर्नाटक) – उडुपी जिल्ह्यातील थेलारू गावात असणार्या दुर्गापरमेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विश्वनाथ नावाच्या हिंदु तरुणावर काही मुसलमान तरुणांनी आक्रमण केले.
विश्वनाथ मंदिरात पोचताच रियाज नावाच्या तरुणाने त्याचे मित्र रिहान, रीमॅन आणि रेफान यांनी विश्वानाथ याला थांबवले आणि ‘तू या मंदिरात का आला ?’ असे विचारले. यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी विश्वनाथ याला मारहाण केली. यात विश्वनाथ याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ते घटनेची सर्व माहिती गोळा करत असून सर्व आरोपींना अटक करण्यासाठी एक विशेष पथक सिद्ध करण्यात आले आहे, तसेच गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिंदु संघटनांचे म्हणणे आहे की, मंदिरात पूजा करणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि अशा प्रकारे कुणावरही आक्रमण करणे, हे धार्मिक सलोखा बिघडवण्याचे षड्यंत्र आहे.
आरोपी आहे बनावट पत्रकार !
रियाज पत्रकार असल्याचा दावा करतो. असे म्हटले जात आहे की, त्याने त्याच्या घरावर, गाडीवर आणि अगदी त्याच्या नारळाच्या झाडावरही ‘पत्रकार’ असा फलक लावला आहे. पत्रकार असल्याचे भासवून अवैध कारवायांमध्ये सहभागी असल्याविषयी रियाझविरुद्ध आधीच अनेक तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर याहून वेगळे काय घडणार ? |