प्रिटोरिया (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेत हिंदु धर्माचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. येथील बरेच लोक सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. दक्षिण आफ्रिकेतील ‘एस्.ए हिंदूज’ या आघाडीच्या हिंदु संघटनेने देशभरातील ८ मंदिरांमध्ये हनुमान चालिसाच्या ६० सहस्र लघुप्रतींचे वितरण केले. ‘एस्.ए हिंदूज’ संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच गौतेंग प्रांतात वितरण मोहीम राबवली आणि गरजूंना दोन टन किराणा सामानाचे वाटपही केले.
२४ ऑगस्ट २०२४ या दिवशी भक्ती उत्सवाच्या वेळी दक्षिण आफ्रिकेतील हिंदूंनी ‘शेरेनो प्रिंटर्स’ आणि ‘इलेक्ट्रो ऑनलाइन मीडिया’ यांच्या भागीदारीने हनुमान चालिसाच्या १० लाख प्रती वितरित करण्याचा उपक्रम सर्वप्रथम चालू केला. वर्ष २०२९ पर्यंत हनुमान चालिसाच्या १० लाख प्रती वितरित करण्याची त्यांची योजना आहे.