‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्‍या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !

देखाव्याच्या माध्यमातून समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याविषयी सकल हिंदु समाज आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

ज्ञानेश महाराव यांच्या चित्रास जोडे मारा आंदोलन !

प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्‍या माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्या चित्रास हिंदु समाजाच्या वतीने जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

हिंदु देवतांचा अपमान करणार्‍या ‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक पेजच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि धर्माभिमानी अधिवक्ते यांच्याकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) !

‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत.

Karnataka Ganapati Procession Violence : मंड्या (कर्नाटक) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर पेट्रोल बाँबद्वारे आक्रमण !

हिंदूंच्‍या देवतेच्‍या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्‍याने जर हिंदू हे राज्‍यघटनेने स्‍वसंरक्षणाच्‍या दिलेल्‍या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्‍यात चूक ते काय ?

गणेशोत्‍सवानिमित्ताने ‘ओम प्रमाणपत्र’ वितरण चळवळीस सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद !

‘ओम प्रमाणपत्र’ ही एक चळवळ ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वासाठी राबवण्‍यात आलेली चळवळ आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली चालू झालेल्‍या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !

भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच सर्वांनाच हिंदु राष्ट्राची स्थापना हवी आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला. या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले सकारात्मक पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

देवीची शिकवण प्रत्येक आईने तिच्या मुलीला द्यावी ! – सौ. क्षितिजा देशपांडे

स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता आदराने, नम्रतेने पहाणारा समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर स्वतःच्या आचरणामध्ये पालट करायला हवा, असे मार्गदर्शन तायक्वांदो प्रशिक्षित असलेल्या सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे स्वत: उच्च न्यायालयात उपस्थित !

श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण !

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था

अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !