पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्या माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्या चित्रास हिंदु समाजाच्या वतीने जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर काटकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. आप्पा माने, डॉ. अभय यादव, सौ. सुप्रियाताई पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, सर्वश्री जयकुमार गणपते, सुधाकर पिसे, सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी स्वामीभक्त, हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.