तांडव वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा ! – हिंदु राष्ट्र सेनेची मागणी

हिंदूंच्या देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या तांडव वेब सिरीज वर तात्काळ बंदी आणावी, तसेच सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

ईशनिंदाविरोधी कायदा करा !

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे.

चित्रपट, नाटके, ओटीटी प्लॅटफॉर्म, तसेच विविध माध्यमे यांद्वारे हिंदूंच्या देवता, तसेच हिंदुत्वावर होणार्‍या आघातांना आळा घाला ! – हमारा देश संघटना

सातत्याने हिंदुत्व, हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना केली जाते. या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

तांडव वेब सिरीजवर बंदी घालण्याची आणि राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याची मागणी

उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालणे आणि राष्ट्रध्वजाचा मान राखणे या दोन विषयांसाठी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने

प्रजासत्ताकदिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालण्याविषयी जिल्ह्यातील भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणा

देवतांचा वेगवेगळ्या माध्यमातून सर्रास होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा.  हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,…

‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी यावल (जिल्हा जळगाव) येथे निवेदन

देवतांचा अवमान करणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. देवतांची विटंबना करणार्‍यांवर वचक बसावा यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.

तांडव वेब सिरीजवर त्वरित बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

हिंदूबहुल देशात देवतांची विटंबना करणार्‍या कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

पुण्यातील नामांकित रुग्णालयाने जिन्याच्या कोपर्‍यात लावलेल्या देवतांच्या फरशा हटवल्या !

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने जिन्यातील कोपर्‍यात देवतांच्या फरशा (टाईल्स) लावून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली होती.