आज दादर येथे ३ सहस्र महिलांकडून पथसंचलन !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

मुंबई – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी आणि मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत) ‘मानवंदना संचलन’ आयोजित करण्यात आले आहे. साध्वी ऋतंभरा यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ जानेवारी या दिवशी दुपारी ४ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे मुख्य कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता ३ सहस्र महिला आणि तरुणी यांच्या भव्य संचलनातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यात येईल. आजच्या तरुणींनी सक्षम व्हावे आणि आपल्या वीरांगनांचे कार्य समाजापर्यंत पोचावे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे, अशी माहिती ३ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत देण्यात आली. विश्व हिंदु परिषद कोकण प्रांत उपाध्यक्षा प्रिया सावंत, मातृशक्ती कोकण प्रांत संयोजिका मनीा भोईर, दुर्गावाहिनी कोकण प्रांत संयोजिका स्वाती भोसले उपस्थित होत्या.