श्री गणेशाचे विडंबन थांबवा !

गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात.

राधाकृष्ण भक्त मंडळाचा श्री गणेश क्रूसावरील येशू ख्रिस्ताला मलमपट्टी करतांनाचा देखावा !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्री गणेशाचे अशाप्रकारे विडंबन केले जात आहे ! केवळ कल्पनाविलास म्हणून अशा कृती चुकीच्या असून असे करून आपण एकप्रकारे देवतेची अवकृपाच ओढावून घेतो !

धारावी (मुंबई) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केला अश्‍लील नाचगाण्याचा कार्यक्रम !

प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी असे चंगळवादी कार्यक्रम आयोजित करणारे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच फाटा देत असल्याने समाजाला धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

पुणे येथे विज्ञापन फलकाद्वारे श्री गणेशाचे विडंबन !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा आस्थापनाच्या उत्पादनांवर भाविकांनी बहिष्कार घालायला हवा, तसेच अशाप्रकारे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

मध्यप्रदेशच्या जनसंपर्क विभागातील ख्रिस्ती कर्मचार्‍याकडून श्री गणेशाचा अवमान !

मुळात मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारने स्वतः कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याच्या रूपातील श्री गणेशाची मूर्ती

कुठे महंमद पैगंबर यांचा कथित अवमान झाल्यावरूनही शिरच्छेद करणारे मुसलमान, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा विविध मार्गाने अवमान करणारे हिंदू !

पंतप्रधान शेख हसीना गप्प राहिल्या, तर बांगलादेशातील हिंदू भारतीय सैन्याचे साहाय्य घेतील ! – ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा दावा

भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?

बेती, वेरे येथील ‘ॲथर’ शो-रूमच्या प्रवेशद्वारावरील श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र प्रबोधनानंतर हटवले

‘‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, तरी संबंधित मालकाशी चित्र काढण्याविषयी बोलून घेतो.’’ यासाठी ‘ॲथर’ शो-रूमच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन !

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !