हिंदूंकडून विरोध करत कारवाईची मागणी
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाच्या सामाजिक माध्यमाच्या ऑस्टिन थॉमस या कर्मचार्याकडून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यानंतर त्याच्यावर टीका होऊ लागल्यानंतर याची चौकशी करण्यात येत आहे.
(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
या व्हिडिओमध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती स्थापित करतात त्या ठिकाणी ऑस्टिन थॉमस हा कर्मचारी बसला होता. त्याने पायात बूट घातले होते. तो श्री गणेशाच्या मुद्रेमध्ये बसला होता. त्याने श्री गणेशमूर्तीच्या पूजनासाठी आलेला हार स्वतःहून गळ्यात घालून घेतला. नंतर त्याने याची छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली. यानंतर लोकांकडून विरोध होऊ लागल्यावर विभागाच्या अधिकार्यांकडून कर्मचार्यांची चौकशी चालू करण्यात आली आहे.
हिंदु महासभेकडून आंदोलनाची चेतावणी
याविषयी अखिल भारतीय हिंदु महासभेचे उज्जैन शहराध्यक्ष राहुल मिश्रा यांनी ‘या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. कारवाई न झाल्यास थॉमस याच्या विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली आहे.
संपादकीय भूमिकामुळात मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारने स्वतः कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! |