‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याच्या रूपातील श्री गणेशाची मूर्ती

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या मूर्ती !

विडंबनात्मक गणेशमूर्ती

मुंबई – दक्षिण भारतीय चित्रपट ‘पुष्पा : द राइज’मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन याने एका विशिष्ट पद्धतीने दाढीला हात लावण्याची केलेली कृती लोकांना आवाडली होती. त्याच कृतीप्रमाणे यंदाच्या श्री गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाची एक मूर्ती बनवण्यात आली असून तिचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात श्री गणेश स्वतःच्या दाढीला त्याच पद्धतीने हात लावत आहे, असे दाखवण्यात आले आहे. याचे सामाजिक माध्यमांतून कौतुक होत असले, तरी मोठ्या प्रमाणात विरोधही होऊन संताप व्यक्त होत आहे.

‘साम्यवाद्यांकडून जाणीवपूर्वक अशा मूर्तींचे प्रसारण केले जात आहेत का ?’, याचा शोध घ्या ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय व्याख्याते आणि इतिहासकार

डॉ. सच्चिदानंद शेवडे

सध्या गंमत किंवा इको फ्रेंडली म्हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींपासून श्री गणेशमूर्ती बनवली जाते. पार्थिव मूर्ती याचा अर्थ काळी माती, लाल माती आणि शाडू माती असा होतो. या मातींपासून बनवलेल्या मूर्ती असाव्यात. गणपति हा गणपतिप्रमाणेच असावा. तो सिनेनट, अंतराळवीर, शिवराय, नेताजी सुभाषचंद्र बोस, नरेंद्र मोदी वा राजकीय नेत्यांच्या रूपात नसावा. नाचणारा, तबला वाजवणारा किंवा ‘सैराट’ चित्रपटामधील आर्ची-परश्या या भूमिकांच्या रूपातला, ‘बाहुबली’, ‘छोटा भीम’ या चित्रपटांतील भूमिकांसारखी श्री गणेशाची मूर्ती बनवू नये. आता अभिनेत्याच्या रूपात गणेशमूर्ती बनवली जात आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या रूपात श्री गणेशाला दाखवून ‘झुकेगा नही साला’ हे या चित्रपटातील वाक्यच तेवढेच लक्षात राहील आणि याची आठवण करून देईल. साम्यवाद्यांकडून अशा मूर्तींचे जाणीवपूर्वक प्रसारण केले जात नाही ना, याचा शोध घेतला पाहिजे. देवाला देवाच्या रूपात दाखवा.

संपादकीय भूमिका

  • कुठे महंमद पैगंबर यांचा कथित अवमान झाल्यावरूनही शिरच्छेद करणारे मुसलमान, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा विविध मार्गाने अवमान करणारे हिंदू !
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते देवतांचे अशा प्रकारे मानवीकरण करून त्यांचा अवमान करत आहेत. हिंदूंच्या धार्मिक संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी आता पुढाकार घेणे आवश्यक आहे !