पुणे येथे विज्ञापन फलकाद्वारे श्री गणेशाचे विडंबन !

पुणे – पिण्याच्या पाण्याचे आस्थापन ‘ऑक्सिकूल’ ने ‘बी कूल लाईक बाप्पा, वेअर अ हेल्मेट’ असे घोषवाक्य असलेला विज्ञापनाचा फलक येथील अलका चौकात लावला आहे. यामध्ये श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले आहे. ‘ऑक्सिकूल’ची पिण्याच्या पाण्याची बाटली दुचाकीप्रमाणे दाखवण्यात आली आहे आणि त्यावर श्री गणेशाला हेल्मेट घालून बसलेले दाखवण्यात आले आहे.

हे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून वाचकांना सत्य समजावे, हा उद्देश आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा आस्थापनाच्या उत्पादनांवर भाविकांनी बहिष्कार घालायला हवा, तसेच अशाप्रकारे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
  • हिंदूंना धर्मशिक्षण देऊन हे श्री गणेशाचे विडंबन आहे, हे सांगणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !