राधाकृष्ण भक्त मंडळाचा श्री गणेश क्रूसावरील येशू ख्रिस्ताला मलमपट्टी करतांनाचा देखावा !

राधाकृष्ण भक्त मंडळाचा श्रीकृष्णाच्या रूपात श्री गणेश क्रूसावरील येशू ख्रिस्तांना मलमपट्टी करतांनाचा देखावा

या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ विडंबन काय केले आहे, ते समजावे यासाठी चित्र प्रकाशित करत आहोत. – संपादक

कोल्हापूर – मंगळवार पेठ येथील राधाकृष्ण भक्त मंडळाने श्री गणेश क्रूसावरील येशू ख्रिस्ताला मलमपट्टी करतांनाचा देखावा केला आहे. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्री गणेशाचे अशाप्रकारे विडंबन केले जात आहे ! केवळ कल्पनाविलास म्हणून अशा कृती चुकीच्या असून असे करून आपण एकप्रकारे देवतेची अवकृपाच ओढावून घेतो ! – संपादक)