‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिराच्या अवमानाचे प्रकरण

नवी देहली – उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिराचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘झोमॅटो’ या ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणार्‍या आस्थापनाने क्षमायाचना केली होती, तसेच संबंधित विज्ञापन हटवले होते; मात्र आता या प्रकरणी देहलीतील अधिवक्ता विनित जिंदल यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

देहलीतील अधिवक्ता विनित जिंदल

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या विज्ञापनात ‘हृतिक रोशन ‘महाकाल’कडून थाळी मागवत आहेत’, असे दाखवण्यात आले होते.