हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

‘अ‍ॅमेझॉन’वरून भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत अश्‍लील चित्राची विक्री

बेंगळुरू (कर्नाटक) – ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ या हिंदुद्वेषी संकेतस्थळावरून ‘इकोलॉजी हिंदू गॉड्स फाइन आर्ट’ या चित्रांमध्ये कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत अश्‍लील चित्र विकले जात होते. याविषयी त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील सुब्रह्मण्यनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यानंतर अ‍ॅमेझॉनने हे चित्र विक्रीतून हटवले.

पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

समितीने तिच्या मागणीमध्ये म्हटले होते की, कोट्यवधी हिंदू श्रीकृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करत असतांना अ‍ॅमेझॉनकडून भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत अश्‍लील चित्र विकणे, हा अक्षम्य गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता २९५, २९५अ आणि २९८ अंतर्गत हा गंभीर गुन्हा आहे. अ‍ॅमेझॉनने यापूर्वीही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा केला आहे. अशा प्रकारे वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अ‍ॅमेझॉन आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे. या संदर्भात श्री. नवीन गौडा, श्री. नीलेश्‍वर, हिंदु नेते श्री. पुरुषोत्तम, सुभाष आदी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही यातून बोध घेऊन देवतांचे विडंबन रोखावे !