पंतप्रधान शेख हसीना गप्प राहिल्या, तर बांगलादेशातील हिंदू भारतीय सैन्याचे साहाय्य घेतील ! – ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा दावा

बांगलादेशात बनवण्यात येत असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची मुसलमानांकडून तोडफोड !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील माणिकगंजच्या हरिरामपूर उपजिल्हामध्ये मुसलमानांनी बनवण्यात येणार्‍या श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड केली. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवामध्ये मुसलमानांनी दंगल घडवली होती. त्यात अनेक हिंदूंच्या घरांची जाळपोळ करण्यास काही हिंदू ठार झाले होते. इस्कॉनच्या आश्रमावर आक्रमण करून तेथील दोघा साधूंची हत्याही करण्यात आली होती. ‘त्याप्रमाणे यावर्षीही काही तरी षड्यंत्र रचण्यात आले आहे’, असे सांगण्यात येत आहे. ‘पंतप्रधान शेख हसीना मागच्या वेळेप्रमाणे गप्प राहिल्या, तर बांगलादेशातील हिंदू उघडपणे भारतीय सैन्याचे साहाय्य घेतील’, असे ट्वीट ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून करण्यात आले आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)

संपादकीय भूमिका

भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?