धारावी (मुंबई) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केला अश्‍लील नाचगाण्याचा कार्यक्रम !

हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर नाचण्याचा अश्‍लील कार्यक्रम

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक) 

मुंबई, ४ सप्टेंबर (वार्ता.) – धारावीमधील बालाजीनगर, कामराज सी.एच्.एस्., ९० फूट रोड येथील शक्ती विनायक मंदिराच्या येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर नाचण्याचा अश्‍लील कार्यक्रम आयोजित केला होता. यात मंचावर एक स्त्री आणि एक पुरुष नाचत होते. या नाचगाण्याचे चित्रीकरण काही जणांनी ‘व्हाट्सअ‍ॅप’वरून प्रसारित केले.

मंदिरासमोरच चालू असलेला हा नाचगाण्याचा कार्यक्रम पहाण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक जण या नाचगाण्याचे चित्रीकरण करत होते. येथे महिलांनी अंगविक्षेप करत हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नाच केला. याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या या अश्‍लील धांगडधिंग्याविषयी धर्मप्रेमी हिंदूंनी संताप व्यक्त केला. (हिंदूनो, आपल्या सण-उत्सवांना अशा प्रकारे बिभत्स स्वरूप आणणार्‍या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करू नका. या भागातील धर्मप्रेमी हिंदूंनी एकत्र येऊन असे कार्यक्रम करणार्‍या मंडळाचे प्रबोधन करावे. यातून होणारी हिंदु धर्माची हानी त्यांच्या लक्षात आणून द्यावी. अन्यथा याकडे दुर्लक्ष करणार्‍यांच्या माथीही हिंदु धर्माच्या र्‍हासाचे पाप लागेल, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • उत्सवाला मौजमजेचे स्वरूप देणार्‍यांवर श्री गणेशाची कृपा कधीतरी होईल का ?
  • प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी असे चंगळवादी कार्यक्रम आयोजित करणारे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच फाटा देत असल्याने समाजाला धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !