पंतप्रधान शेख हसीना गप्प राहिल्या, तर बांगलादेशातील हिंदू भारतीय सैन्याचे साहाय्य घेतील ! – ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा दावा

भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?

बेती, वेरे येथील ‘ॲथर’ शो-रूमच्या प्रवेशद्वारावरील श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र प्रबोधनानंतर हटवले

‘‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, तरी संबंधित मालकाशी चित्र काढण्याविषयी बोलून घेतो.’’ यासाठी ‘ॲथर’ शो-रूमच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन !

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !

हिंदु धर्मविरोधकांना चाप !

. . . याचा अर्थ हिंदु समाजमन आता जागे होत असून जागृत हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांप्रती सजग झाले आहेत. कोणतेही मोठे नेतृत्व नसतांना सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन, तसेच छोट्या छोट्या कृतींमधून हिंदू धर्मविरोधकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत !

हिंदूंना लक्ष्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ ! – नितेश राणे, नेते, भाजप

हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

भोपाळमध्ये शिवमंदिरातील शिवलिंगाची तोडफोड !

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘मासूम सवाल’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर ‘सॅनिटरी पॅड’वर भगवान श्रीकृष्णाचे चित्र

इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

‘बुकर’ पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांचा आगरा येथील कार्यक्रम स्थगित

पुस्तकातून हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार