बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाला धर्मांतर न केल्यास ठार मारण्याची धमकी

  • मुसलमानबहुल गावातील धर्मांधांची मोगलाई !

  • देवतांच्या चित्रांवर थुंकले

  • धर्मांतर न केल्यास गाव सोडून जाण्याची धमकी

  • ३ धर्मांध मुसलमानांना अटक

घटनास्थळ

बलरामपूर (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु कुटुंबाला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न काही मुसलमानांनी केल्याचा आणि तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांतील ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘अन्य आरोपींना लवकरच अटक करू’, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

१. या कुटुंबातील महिल दीपा निषाद हिने आरोप केला आहे की, हा भाग मुसलमानबहुल आहे. येथे मुसलमानांनी ‘मुसलमान बना किंवा घर विकून गाव सोडून निघून जा अन्यथा पूर्ण कुटुंबाला ठार मारू’ अशी धमकी दिली. त्या वेळी त्यांनी आम्हाला मारहाण केली, तसेच ते आमच्या देवतांच्या चित्रांवर थुंकले. मुसलमान म्हणाले, ‘‘आता तुम्ही मुसलमान झाला आहात. तुमचे मंदिर अपवित्र झाले आहे.’’ त्यांच्या अत्याचारांमुळे आम्ही २ वर्षांपूर्वी घर सोडून अन्यत्र रहाण्यास गेले होतो. आम्ही परत आल्यानंतर ते पुन्हा धर्मांतरासाठी धमकी देत आहेत.

२. या संदर्भात ३ व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. यात मुसलमान या हिंदु महिलेच्या कुटुंबाला शिवीगाळ करतांना, काठ्या, विटा यांद्वारे घरावर आक्रमण करतांना, थुंकतांना दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! या कुटुंबाला तात्काळ संरक्षण पुरवून जेथे हिंदु धर्मीय अल्पसंख्य आहेत, तेथे सरकारने धर्मांधांवर धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
  • एखादा भाग मुसलमानबहुल झाल्यास काय घडते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !