दरभंगा येथे मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणार्‍या महंमद चांद यास अटक !

दरभंगा (बिहार) – येथील एका आझमनगर परिसरात असलेल्या ब्रह्मस्थान मंदिरात घुसून महंमद चांद नावाच्या मुसलमान आरोपीने तेथील हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. त्यानंतर त्याने त्या मूर्ती जवळच्या तलावात फेकून दिल्या. या घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी निदर्शने करत दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त हिंदूंना शांत करण्याचा प्रयत्न केला, तसेच आरोपीला अटक केली. यासह पोलिसांनी तलावातील मूर्ती काढून मंदिराच्या आवारात ठेवल्या.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

काही वर्षांपूर्वी आझमनगर येथील दुर्गादेवीच्या मंदिराजवळ भीषण स्फोट झाला होता.

संपादकीय भूमिका

बिहारमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! अशा घटना कधी मशीद किंवा चर्च येथे घडतात का ? हिंदू असंघटित असल्यानेच कुणीही उपटसुंभ उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन करतो, हे हिंदूंना लज्जस्पद !