परिपक्वता आणि नेतृत्वगुण असलेले सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) !

शाळेच्या प्रांगणात सर्व मुले एकत्र जमली असतांना अकस्मात् पाऊस पडणे, सर्व मुले इतरत्र धावत असतांना पू. भार्गवराम यांनी त्यांना एकत्र करून एका झाडाखाली घेऊन जाणे आणि पाऊस थांबण्यासाठी सर्वांना देवाकडे प्रार्थना करण्यास सांगणे….

अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पहातांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे आपले नारायण आहेत. प्रत्यक्ष श्रीराम तिथे आहेत’, असेच जाणवते. आता सूक्ष्मातून आपत्काळ असेल. भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू होईल.’’

अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहून सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

श्रीरामाची मूर्ती जवळून पाहिल्यावर मूर्तीत भाव जाणवतो आणि दूरून पाहिल्यावर ‘राम ध्यान करत आहे’, असे वाटते. ‘साक्षात् राम उभा आहे’, असे वाटते.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (वय ८१ वर्षे) यांच्‍याविषयी सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांचा भाव आणि प्रीती दर्शवणारे काही भावस्‍पर्शी क्षण !

पू. मामांना संपूर्ण दिवस नामजप करणे साध्‍य होते; कारण परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांना पुष्‍कळ शक्‍ती आणि चैतन्‍य देतात.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांच्यात बालवयातच असलेली चुकांविषयीची संवेदनशीलता आणि शिकण्याची वृत्ती !

या संवादातून पू. भार्गवराम यांची शिकण्याची वृत्ती माझ्या लक्षात आली. ‘गुरुदेवा, केवळ आपल्याच कृपेने पू. भार्गवराम विचारत असलेल्या प्रश्नांना मला उत्तरे देता आली’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

 पणतू पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांनी जिज्ञासेने विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांना घडवणार्‍या  पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या पुढील परिसरात नंदी, कामधेनू, गरूड आणि पुष्पक विमान थांबले आहे. आपत्काळात संकटात असणार्‍यांना साहाय्य करण्यासाठी श्रीविष्णूने त्यांना देवलोकातून भूलोकात पाठवले आहे.

प.पू. दास महाराज यांनी पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत, वय ८५ वर्षे) यांच्या निवासस्थानी दिलेली भावस्पर्शी भेट !

प.पू. दास महाराज (बांदा (जि. सिंधुदुर्ग)) यांचा दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांतील आध्यात्मिक संस्थांना भेटी देण्याचा कार्यक्रम होता.

सनातनचे मंगळुरू, कर्नाटक येथील पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांच्या सत्संगात सौ. निवेदिता जोशी यांना आलेल्या अनुभूती !

ठाणे येथील सौ. निवेदिता जोशी या एप्रिल २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांना पू. भार्गवराम प्रभु यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

‘आज्ञापालन आणि निरीक्षणक्षमता’, हे गुण अंगी असणारे अन् कृतज्ञताभावात रहाणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) !

डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) मंगळुरू येथे साधकांसाठी उपचार करण्यासाठी आले होते. तेव्हा पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांची त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) रुग्‍णाईत असतांना जाणवलेली त्‍यांची सहनशीलता, स्‍थिरता आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धा !

पू. भार्गवराम यांना पुष्‍कळ ताप आला होता. सर्व औषधोपचार करूनही त्‍यांचा ताप उणावत नव्‍हता. त्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात भरती करावे लागले. तेव्‍हा मला त्‍यांची सहनशीलता, समजूतदारपणा, स्‍थिरता आणि गुरुदेवांवरील अतूट श्रद्धा प्रकर्षाने जाणवली. त्‍याविषयीची सूत्रे, तसेच पू. भार्गवराम आणि पू. वामन राजंदेकर यांना एकसारखी आलेली अनुभूती येथे देत आहेत.