अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहून सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

‘२२.१.२०२४ या दिवशी मंगळुरू येथे अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या (बालक रूपातील रामाच्या) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्या वेळी पू. भार्गवराम श्री रामललाच्या मूर्तीकडे बराच वेळ एकटक पहात होते. मी पू. भार्गवराम यांना ‘तुम्हाला श्री रामललाच्या मूर्तीकडे पाहून काय वाटले ?’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘श्री रामललाच्या मूर्तीतून पुष्कळ चैतन्य संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित होत आहे.

२. रामभक्तांंचे त्रास दूर होऊन त्यांना उत्कट रामभक्ती करण्यासाठी स्फूर्ती मिळत आहे. श्रीराममूर्तीच भक्तीमय आहे. जे श्रीरामाची भक्ती करत नाही, त्यांचाही भाव ही मूर्ती पाहून जागृत होईल.

सौ. भवानी प्रभु

३. श्रीरामाचे पाणीदार डोळे, हे त्याच्या निर्मळ प्रीतीचे स्वरूप आहे. या मूर्तीतून श्रीरामाच्या अपार प्रीतीचा वर्षाव होत आहे.

४. श्रीरामाची मूर्ती जवळून पाहिल्यावर मूर्तीत भाव जाणवतो आणि दूरून पाहिल्यावर ‘राम ध्यान करत आहे’, असे वाटते. ‘साक्षात् राम उभा आहे’, असे वाटते. माझेही ध्यान लागत आहे.

५. श्रीरामाची मूर्ती पाहून ‘काही बोलावे’, असे वाटत नाही. मी निर्विचार स्थिती अनुभवत आहे.’’

६. अयोध्या येथे राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘राम अवतरले आहेत. पृथ्वीवरील तेज वाढले आणि शीतल हवाही वहात आहे. एकाच वेळी तेज आणि वायु यांची अनुभूती येत आहे.

७. लोकांनी श्रीरामाची भक्ती करून श्रीराममंदिर बनवले आहे. लोकांनी याच्या १०० पटींनी अधिक भक्ती केल्यानंतरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.

८. गुरुदेवही रामच आहेत. ते साक्षात् विष्णु आहेत.’’

– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (२३.१.२०२४)


श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना श्रीरामाच्या वेशात पाहून समाजातील व्यक्ती आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

‘श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पू. भार्गवराम प्रभु यांना श्रीरामाप्रमाणे आभूषणे घालावीत’, असे वाटले. पू. भार्गवराम यांना या रूपात पाहून साधक आणि समाजातील व्यक्ती यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीरामाच्या वेशात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु

१. ‘पू. भार्गवराम यांना बाल रामाच्या रूपात पाहून आमची भावजागृती होत होती. आम्हाला आनंद झाला’, असे साधकांनी सांगितले.

२. समाजातील एका व्यक्तीने पू. भार्गवराम यांना पाहून सांगितले, ‘‘राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली आणि येथे श्री रामलला प्रत्यक्षात आले आहेत.’’

३.‘पू. भार्गवराम अयोध्येतील श्री रामललाप्रमाणे दिसत आहेत’, असे अनेक साधक आणि नातेवाईक यांनी सांगितले.

‘गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हाला पू. भार्गवराम यांच्यामध्ये असलेल्या श्रीरामतत्त्वाची अनुभूती आली’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू. (२३.१.२०२४)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक