‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ७ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे ! 

२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत रामनाथ देवस्थान (फोंडा, गोवा) येथे होणार्‍या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ७ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

​‘२३.६.२०२४ या दिवशी मी पू. भार्गवराम यांना सांगितले, ‘‘उद्यापासून ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू होणार. तेथे अनेक हिंदूसंघटक आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती पुढील वर्षासाठी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याचे नियोजन करतील.’’ तेव्हा पू. भार्गवराम गंभीर होते. मी त्यांना विचारले, ‘‘आपण काय विचार करत आहात ?’’ त्या वेळी पू. भार्गवराम यांनी पुढील सूत्रे सांगितली.

पू. भार्गवराम प्रभु

१. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आहे. तो साकार करण्यासाठी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव होणार आहे.

२. गुरुदेवांनी आपल्या सर्वांना या महोत्सवात सेवा करण्याची संधी दिली आहे. हा महोत्सव म्हणजे जणूकाही गुरुदेवांच्या शक्तीचे प्रदर्शनच आहे.

सौ. भवानी प्रभु

३. या महान कार्यात तन, मन, बुद्धी आणि आत्माही अर्पण करायचा आहे. माया, संसार, सुख-सुविधा, इच्छा, आकांक्षा, या सर्वांपेक्षा गुरूंची सेवा मोठी आहे.

४. गुरुदेव लढण्यासाठी आपल्या पायांत शक्ती देतील. गुरुदेवच आपल्या मनाला ऊर्जा पुरवतील. चैतन्याचे संरक्षककवचही तेच देतील; परंतु आपल्याला यासाठी प्रार्थना आणि साधना करायला पाहिजे.

५. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आपल्याला परिश्रम करावे लागतील. आपत्काळाची तीव्रता पुष्कळ आहे. समाजात वाईट लोक आहेत. त्यामुळे चांगल्या लोकांना पुढाकार घेऊन परिश्रम करावे लागतील. आपण परिश्रम केले नाहीत, तर आपण आपलाच नाश करून घेणार आहोत, म्हणजे आपल्यालाच शिक्षा मिळण्यासारखे आहे.

६. यासाठी आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन बलवान व्हायचे आहे. धर्म आणि सत्य यांचा विजय होण्यासाठी कार्य करायचे आहे अन् मनात केवळ आणि केवळ गुरूंचे स्मरण अन् हिंदु राष्ट्राचा संकल्प करायचा आहे.’

– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू, कर्नाटक. (२३.६.२०२४) ​

‘पू. भार्गवराम प्रभु यांनी सांगितलेली वरील सूत्रे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशात असतील’, असे वाटणे आणि तसेच घडणे

‘पू. भार्गवराम यांनी काल ही सूत्रे सांगितली. त्यांतील सूत्रे आज ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वाचून दाखवण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशात असतील’, असा विचार माझ्या मनात आला.’ – सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू (२३.६.२०२४) ॐ
(‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या महान कार्यात आपल्याला तन, मन, धन आणि प्राण अर्पण करावे लागतील’, हे सूत्र ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वाचून दाखवण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशात होते.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२४))