हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !

जुने पारगाव येथील समर्थांच्या झोळीतील मारुति येथील मंदिरात गदापूजनाच्या प्रसंगी भाविक, धर्मप्रेमी

कोल्हापूर – हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने कोल्हापूर जिल्हा आणि निपाणी (कर्नाटक) येथे १७७ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. यात प्रामुख्याने समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असलेल्या मनपाडळे येथील प्रताप मारुति, जुने पारगाव येथील समर्थांच्या झोळीतील मारुति, अक्कोळ येथील शिवकालीन युद्धकला आखाडा यांसह जिल्ह्यातील अनेक महत्त्वांच्या हनुमान मंदिरांत हे पूजन झाले.

अक्कोळ येथील शिवकालीन युद्धकला आखाडा येथील गदापूजनाच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी
मनपाडळे येथील प्रताप मारुति मंदिरात गदापूजनाच्या प्रसंगी भाविक, धर्मप्रेमी

१. उंचगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. शरद माळी, हिंदू एकता तालुकाध्यक्ष श्री. आबा जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री बाल हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, लखन चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.

निपाणी (कर्नाटक) येथील ‘सद्गुरु त्वायक्वांदो स्पोर्टस् ॲकॅडमी’ येथे गदापूजनप्रसंगी श्री. बबन निर्मळे आणि ‘ॲकॅडमी’तील विद्यार्थी

२. निपाणी येथे ‘सद्गुरु त्वायक्वांदो स्पोर्ट्स ॲकॅडमी’चे संस्थापक श्री. बबन निर्मळे यांच्या पुढाकाराने गदापूजन घेण्यात आले. या प्रसंगी ‘ॲकॅडमी’तील विद्यार्थी उपस्थित होते.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे गदापूजनाच्या प्रसंगी उपस्थित भाविक

३. इचलकरंजी, घुणकी, हुपरी, निपाणी यांसह अनेक गावांमध्ये महिलांच्या पुढाकाराने गदापूजन घेण्यात आले. या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील तालीम ‘जय हनुमान कुस्तीसंकल गदापूजनप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, तसेच तालीममधील उपस्थित पैलवान (संकेतस्थळावर) वस्तात श्री. प्रकाश काळे
घुणकी येथील श्रीराम मंदिरात गदापूजन करतांना भाविक, धर्मप्रेमी
उमळवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे गदापूजन प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ
वाळवेकरनगर, हुपरी येथे सहभागी भाविक, धर्मप्रेमी

४. शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘जय हनुमान कुस्तीसंकुल’ तालीम येथे वस्ताद श्री. प्रकाश काळे यांच्या पुढाकाराने गदापूजन झाले. तेथील पैलवानांनी येथे अत्यंत भावपूर्ण सिद्धता केली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, धर्मप्रेमी श्री. जितेंद्र पंडित, तसेच तालमीमधील पैलवान उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात ४० ठिकाणी गदापूजन !

सांगली – सांगली जिल्ह्यात ४० ठिकाणी गदापूजन करण्यात आले. यात प्रामुख्याने मिरज येथील संत वेणास्वामी मठ येथे पू. कौस्तुभबुवा रामदासी यांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ यांची उपस्थिती होती. विटा येथे संत रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असलेल्या मंदिरात गदापूजन करण्यात आले.

पलूस येथील सद्गुरु धोंडीराज महाराज मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी डॉ. विशाल पाटील यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले.
विटा (जिल्हा सांगली) येथे संत रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असलेल्या मंदिरात पूजन करतांना हिंदुत्वनिष्ठ

१. मिरज येथील अंबाबाई तालीम येथे गदापूजन करण्यात आले.

२. पलूस येथील मारुति मंदिर येथे मंदिराचे विश्वस्त श्री. संजय प्रभाकर परांजपे यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले. येथे १०० हून अधिक भाविक, धर्मप्रेमी उपस्थि होते.

३. पुणदी (तालुका पलूस) येथील दत्त मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण संयोजक श्री. राहुल इंगळे आणि सौ. शिल्पाताई राहुल इंगळे यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले.

४. विश्रामबाग येथील ‘रमणी क्लासेस’ या ठिकाणी गदापूजन करण्यात आले.

५. पलूस येथील सद्गुरु धोंडीराज महाराज मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी डॉ. विशाल पाटील यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले.