हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी !

असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे तरुणावर अत्याचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास अटक !

पोलीस विभागाला कलंक असणारे पोलीस कर्मचारी ! जनतेचे रक्षण दूरच, तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस हे वर्दीतील गुन्हेगार !

हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

न्यायाधिशांना मारहाण करणारे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, हे लक्षात येते !

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्यावर आक्रमण केल्याच्या आणि त्यांना अश्‍लील शब्दांत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी दोघा पोलिसांना अटक करण्यात आली. या पोलिसांनी न्यायाधीशांना मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुल रोखले !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११७ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरणार्‍या धर्मांधाला वाहन जप्त करण्याची नोटीस !

११७ वेळा नियमांचे उल्लंघन होईपर्यंत पोलीस झोपले होते का ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांसह दोघांना फरार घोषित !

३० दिवसांच्या आत न्यायालयापुढे उपस्थित न राहिलास त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्यशासनाला असणार आहे.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील अल्पवयीन पीडितेवर २ पोलिसांसह शेकडो जणांकडून अत्याचार !

असुरक्षित अल्पवयीन मुली आणि महिला ! ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील महिलांची दुर्दैवी स्थिती ! पोलीसच असे करत असतील, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे.

गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत १ सहस्र ८८८ जणांचा मृत्यू

पोलीस कोठडीत आरोपींना मारहाण केली जाते, तसेच त्यांचा छळ केला जातो, त्यात अनेकांचा मृत्यू होतो, तरीही या प्रकरणी कुणाला शिक्षा होत नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! कोठडीतील मृत्यू म्हणजे पोलिसांनी केलेली हत्याच नव्हे का ? सरकारने याकडे गांभीर्याने पाहून उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !

राज्यपालांकडे रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणार ! – विहिंप

रझा अकादमी आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध हिंसाचाराचे गुन्हे नोंद केले पाहिजेत. या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.