मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांसह रिजाय भाटी आणि विनय सिंह यांना मुंबईतील विशेष दंडाधिकारी न्यायालयाने १७ नोव्हेंबर या दिवशी फरार घोषित केले आहे. ३० दिवसांच्या आत न्यायालयापुढे उपस्थित न राहिलास त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्यशासनाला असणार आहे. खंडणी वसुलीच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने अनेक वेळा समन्स काढूनही हे तिघेही पोलिसांपुढे उपस्थित राहिले नव्हते.