बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘वास्तविक शाश्वत सुखप्राप्तीसाठी विशेष काही करावयास नको. फक्त देवाप्रीत्यर्थ जे काही करतो, ते निष्कामपणे घडले, म्हणजे झाले

श्रीराममंदिर उभारल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याच ‘तुकडे तुकडे गँग’चे षड्यंत्र ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी न्यास

संतांच्या या सूचक वक्तव्याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहून राममंदिराच्या रक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे !

निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, ‘‘माणूस बुद्धीमान आहे. तो नित्य नवे शिकत असतो; मात्र जीवन जगण्याची खरी कला माणसाला अवगत नाही. आपण भूमातेला आई म्हणतो. तिच्या उदरामध्ये विविध पिके घेतो. ही माती माणसाला जिवंत ठेवते; परंतु या मातीसाठी आपण काय करतो ?

जन्महिंदूंचे कर्महिंदूंत रूपांतर करण्याचे कार्य मंदिरांच्या माध्यमातूनच शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील संत आणि मान्यवर यांचे विचारधन ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. … Read more

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्मरक्षणाचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

ओझर (पुणे) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ ! मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील ५५० हून अधिक विश्‍वस्त एकवटले ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला … Read more

राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘सेवा करतांना मनात प्रतिक्रिया आली, तर ती सेवा भावपूर्ण होत नाही. जेथे प्रतिक्रिया असते, तेथे भाव असू शकत नाही. कृती करतांना आपल्या मनात भाव असेल, तर त्या कृतीत देवत्व येते; म्हणून साधकांनी भावासहित सेवा करायला हवी.

सतत साधकांच्या उद्धाराचा विचार करणार्‍या आणि उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही अतिशय विनम्र असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘२६.८.२०२३ या दिवशी श्री गुरुकृपेने मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा अमूल्य सत्संग लाभला. त्यांनी मला केलेले मार्गदर्शन आणि मला त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

‘एकनाथी भागवत’ ग्रंथनिर्मितीची आगळी कथा, त्या कथेतून शिकायला मिळालेली उद्बोधक सूत्रे आणि ग्रंथ वाचनाने झालेला लाभ !

नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय; पण ‘आहे’ आणि ‘नाही’ या दोन्ही भावांचे चिंतन करणे सोडून दिल्यावर न भजतांही भजन घडते.

धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल ! – माता अमृतानंदमयी देवी

जगात सर्वत्र ‘अम्मा’ म्हणून भक्तीभावाने संबोधल्या जाणार्‍या माता अमृतानंदमयी देवी यांनी २६ नोव्हेंबर या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले.