श्रीराममंदिर उभारल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याच ‘तुकडे तुकडे गँग’चे षड्यंत्र ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी न्यास

पुणे येथे आयोजित ‘दो धागे श्रीराम के लिए’ कार्यक्रम !

(‘तुकडे तुकडे गँग’ म्हणजे देशविघातक कारवाया करणारी टोळी)

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

पुणे – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीत भव्य असे श्रीराममंदिर उभारले जात आहे. हे अशा वेली ‘मंदिर उभे तर होऊ द्या. ज्याप्रमाणे जुनी मंदिरे उद्ध्वस्त केली, तशाच प्रकारे याही मंदिराचे करायला हवे’, असे षड्यंत्र ‘तुुकडे तुकडे गँग’ किंवा अशी मनोवृत्ती असलेल्या काही मंडळींनी रचले आहे. त्या सर्वांवर जरब निर्माण करण्यासाठी केवळ श्रीरामाचे मंदिर उभारून चालणार नाही, तर ‘समर्थ राष्ट्र मंदिर’ उभे करण्याची आवश्यकता आहे. हे राष्ट्र बलशाली झाले पाहिजे, असे वक्तव्य श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले. (संतांच्या या सूचक वक्तव्याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहून राममंदिराच्या रक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे ! – संपादक) येथील मॉर्डन कॉलेज मैदानात सामाजिक कार्यकर्त्या अनघा घैसास यांच्या संयोजनातून ‘दो धागे श्रीराम के लिए’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.

सौजन्य सह्याद्री न्यूज 

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पुढे म्हणाले की

१. यापूर्वी श्रीराममंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधली होती. त्यानंतर मशीद पाडून त्या ठिकाणी भव्य राममंदिर बांधण्यात येत आहे. भव्य असे राममंदिर आपण उभारत आहोत; परंतु श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही, तर श्रीरामाचे कार्य आणि राममंदिराचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे.

२. सहस्रो वर्षांपूर्वी आपली मंदिरे पाडण्यात आली. ‘सातत्याने ही मंदिरे काही वर्षांनी का पाडण्यात येतात ?’, ‘उद्ध्वस्त का होतात ?’, याची कारणमीमांसा करावी लागेल.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्येचे कोषाध्यक्ष आहेत. म्हणून त्यांच्या या वक्तव्याकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहिले जात आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक आणि श्रीराममंदिर ट्रस्टचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी, मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती नीलम गोर्‍हे  उपस्थित होत्या.