१. ‘सेवा करतांना मनात प्रतिक्रिया आली, तर ती सेवा भावपूर्ण होत नाही. जेथे प्रतिक्रिया असते, तेथे भाव असू शकत नाही. कृती करतांना आपल्या मनात भाव असेल, तर त्या कृतीत देवत्व येते; म्हणून साधकांनी भावासहित सेवा करायला हवी.
२. साधकांनी आपल्या साधनेत सातत्य न रहाण्याचे कारण शोधायला हवे.
३. दुसर्यांच्या कृतीची नक्कल (कॉपी) करू नये. दुसर्यांचे चांगले विचार आणि गुण यांचा अभ्यास करायला हवा. आपण केवळ नक्कल केली, तर तो दिखाऊपणा होतो.
४. ‘आपल्या मनातील विचार म्हणजे स्वेच्छा’, असे नसते. तो विचार देवाचाही असू शकतो आणि कधी कधी तो योग्य असतो. त्या वेळी साधनेसाठी तो विचार आवश्यक असतो.
५. मनोलय केल्याने आपल्यात ऐकण्याची वृत्ती निर्माण होते.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.९.२०२१)
संग्राहक : कु. प्रार्थना महेश पाठक (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, आताचे वय १२ वर्षे), पुणे (२८.९.२०२१)