श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासमध्ये होत आहे अपप्रकार !

येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी बंधनकारक असलेल्या ‘अ‍ॅक्सिस कार्ड’मध्ये (दर्शनपासमध्ये) अपप्रकार होत असल्याचा आरोप श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी केला आहे.

मंदिरांची ही लूट रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे एका प्राचीन शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करतांना गावकर्‍यांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये सापडलेले ५६५ ग्राम सोने सरकारी अधिकार्‍यांनी सरकार जमा केल्याने गावकरी ते परत मिळवण्यासाठी चळवळ राबवत आहेत.

कांचीपुरम् (तमिलनाडु) के एक प्राचीन शिव मंदिर में मिला ५६५ ग्राम सोना सरकार ने अपने पास जमा किया !

मंदिरों का धन मंदिरों में ही रहना चाहिए !

अयोध्येनंतर मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’

ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे,

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.