त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील देणगी दर्शन ऐच्छिक ! – उच्च न्यायालय

नाशिक – जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील देणगी दर्शनाविषयी देवस्थानद्वारे कुठलीही बळजोरी केली जात नसून भक्तांसाठी हा विषय ऐच्छिक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला होणार आहे.

‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात भाविकांची सदैव गर्दी असते. लवकर दर्शन मिळण्यासाठी अनेक जण प्रती व्यक्ती २०० रुपये देणगी देऊन दर्शन घेतात. त्यामुळे इतर भाविकांवर अन्याय होतो’, असा दावा देवस्थानच्या माजी विश्‍वस्त ललिता शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी याविषयी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या एका याचिकेत केला होता. यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याविषयी याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. ‘त्र्यंबकेश्‍वर मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून सर्वस्वी निर्णय त्यांचे असतात. विश्‍वस्त मंडळाला असे निर्णय घेता येत नाहीत. हा इतर सर्वसामान्य भाविकांवर अन्याय आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • देवाला दर्शनासाठी भक्तांचे पैसे नाही, तर त्यांचा भाव हवा असतो’, हेच हिंदूंना ज्ञात नसल्याने ते पैसे देऊन लवकर दर्शन घेण्याच्या मागे लागतात ! हिंदूंची ही दयनीय स्थिती पालटण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच यावरून लक्षात येते !
  • सरकारीकरण झालेली मंदिरे घोटाळ्यांची केंद्रे बनल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे स्थानच उपलब्ध नाही. त्यामुळे मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती धर्मशिक्षण देणारी केंद्रे बनण्यासाठी हिंदूंनीच वैध मार्गाने लढा देणे आवश्यक आहे !