तौक्ते चक्रीवादळामुळे वीज खात्याची २५ कोटी रुपयांची हानी
वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत.