बेळगाव – चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा निसार अहमद फक्रुसाब चापगावी नावाच्या ६८ वर्षीय वृद्ध आरोपीला न्यायालयाने २० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
२४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी नंदगड पोलीस ठाण्याच्या सीमेत ही घटना घडली होती. निसार याने चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध नंदगड पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून २० वर्षांची कारावासाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संपादकीय भूमिकावासनांध मुसलमान ! |