School Principal Controversial Statement On Lord Ram : ‘हिंदू ही रामाची अनौरस मुले’, असे स्टेटस ठेवणार्‍या ख्रिस्ती शाळेच्या मालकाला पोलिसांकडून अटक !

(‘स्टेटस म्हणजे सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर इतरांना पहाता येण्यासाठी प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.)

अटक करण्यात आलेला जॉय स्कूलचा मालक अखिलेश मेबन

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील जॉय स्कूलचा मालक अखिलेश मेबन याला केरळमधून अटक करण्यात आली. अखिलेश मेबन याने व्हॉट्सॲपवर ‘हिंदू ही रामाची अनौरस मुले आहेत’, असे अत्यंत आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. (बाटगे ख्रिस्ती हे पोपसेक्षाही कडव असतात, अशी म्हण आहे. अखिलेन मेबन याच्या स्टेटसवरून ही म्हण सार्थ होते ! – संपादक) शहरामध्ये ३० मार्च या दिवशी हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचा आरोप करून संतप्त हिंदूंनी एका ख्रिस्ती धर्मप्रचारकाला चोप दिला. त्यानंतर अखिलेश मेबन याने हे स्टेटस ठेवले. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी रस्त्यावर उतरून अखिलेश मेबन याच्या अटकेची मागणी केली.

१. अखिलेश मेबन हा मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर तो नागपूरला पळून गेल्याचे कळले.

२. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी १२ पथकांची स्थापना केली. त्याने मित्राला दूरभाष केला. त्यावरून तो केरळमध्ये असल्याचे पोलिसांना समजले आणि नंतर त्याला तिथे जाऊन अटक केली.

संपादकीय भूमिका

  • ख्रिस्ती शाळांच्या मालकाचे विचार असे असतील, तर अशा शाळेत मुलांवर काय संस्कार केले जात असतील, याचा विचारही न केलेला बरा !
  • कॉन्व्हेंट किंवा ख्रिस्ती संस्थांनी चालवलेल्या शाळा या हिंदु संस्कृती आणि धर्म यांच्यावर आघात करणार्‍या असल्याने सरकारने त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक !