Saudi Arabia Visa Rule : सौदी अरेबियाकडून भारतासह १४ देशांना देण्यात येणार्‍या व्हिसावर तात्पुरती बंदी

(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.)

रियाध (सौदी अरेबिया) – येत्या हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या नागरिकांसाठी यात्रा, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर तात्पुरती बंदी घातली आहे. हे निर्बंध जूनच्या मध्यापर्यंत लागू रहाणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन, या देशांचा समावेश आहे.

हा निर्णय घेण्यामागे सौदी अरेबियाच्या अधिकार्‍यांनी दोन मुख्य कारणे सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे लोक अवैधपणे हज यात्रेत सहभागी होऊ शकत नाहीत; कारण बरेच लोक विविध प्रकारच्या व्हिसावर देशात येतात आणि हज यात्रा या धार्मिक कार्यक्रमात अवैधपणे सहभागी होतात. यामुळे गर्दी आणि सुरक्षा यांचे धोके वाढले आहेत. दुसरे कारण म्हणजे अवैध रोजगार. लोक व्यवसाय आणि कुटुंब व्हिसाद्वारे सौदीत पोचले असून अनुमतीखेरीज काम करतात. यामुळे कामगार बाजारपेठेतील समस्या वाढत आहेत.