|

बरेली (उत्तरप्रदेश) – शहरातील आसिफ कुरेशी याने स्वतःची आशिष अशी ओळख सांगून एका दलित युवतीला फसवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. आसिफ स्वतः हिंदु असल्याचे पटवून देण्यासाठी हातावर पवित्र धागा बांधायचा, तसेच टिळा लावायचा. त्याने तो कायद्याचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. फरीदपूरच्या सरकारी महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकणार्या एका दलित तरुणीशी त्याने मैत्री केली. त्याने संबंधित युवतीला फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
१. आसिफ कुरेशी पीडित युवतीला नवडिया अशोक गावातील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.
२. त्या वेळी युवतीला कळले की, तो आशिष नसून आसिफ कुरेशी आहे आणि तो व्यवसायाने कसाई आहे.
३. घाबरलेल्या युवतीने घरी पोचून सर्व माहिती तिच्या कुटुंबियांना सांगितले. कुटुंबियांनी आसिफ कुरेशी याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
४. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे आशिष या नावाचे बनावट आधारकार्ड सापडले.
संपादकीय भूमिका
|