Bengal Puja Pandal Set On Fire : बंगालमध्ये अज्ञातांनी पूजा मंडप आणि देवतांची मूर्ती यांना लावली आग !

घटनास्थळ
हे छायाचित्र देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक

कोलकाता (बंगाल)- बंगालमध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गोबरडांगा शहरात अज्ञातांनी पूजेच्या मंडपाला आणि तेथे असणार्‍या देवतांच्या मूर्तींना आग लावल्याची घटना ३ एप्रिलच्या पहाटे घडली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही आग लावण्यात आल्याचे येथील पुजार्‍याने सांगितले. सकाळी ही बातमी पसरताच परिसरात तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी रस्ता बंद करून या घटनेचा निषेध केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

बंगालचे बांगलादेश झाल्याचे दर्शवणारी ही आणखी एक घटना !  केंद्र सरकार ना बांगलादेशातील हिंदूंविषयी काही करत ना बंगालमधील हिंदूंविषयी, असेच हिंदूंना वाटते !