Shri Ram Navami Celebrated : देशभरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी !

नवी देहली – देशभरात ६ एप्रिल या दिवशी उत्साहात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. देशातील विविध श्रीराममंदिरांत पूजा करण्यात आली. अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविकांनी श्रीराममंदिरात श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी रांग लावली होती. येथे दुपारी श्रीरामजन्माच्या वेळी, म्हणजे १२ वाजता श्री रामलल्लांच्या माथ्यावर सूर्यकिरण पाडण्यात आले. वाराणसी येथे मुसलमान महिलांनी श्रीरामनवमीच्या वेळी महाआरतीमध्ये सहभाग घेतला. शेकडो ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांनी भव्य मिरवणूक काढली होती. यात सहस्रो भाविक सहभागी झाले होते. बंगाल येथेही अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. या संदर्भात कुठे अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त रात्री उशिरापर्यंत नव्हते.