नवी मुंबई – तुर्भे मॅफको विभागामध्ये मागील ३ दिवसांपासून रात्री विद्युतपुरवठा अनेक घंटे खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री १२.३० वाजता महावितरणच्या मॅफको कार्यालयासमोर रस्ता अडवून निदर्शने केली.
दिवसा वीज जात असल्याने व्यावसायिकही संतप्त झाले आहेत. प्रतिदिन रात्री ११ ते अडीच वाजेपर्यंत किंवा पहाटेपर्यंत विद्युतपुरवठा खंडित होत आहे. वीजेअभावी डास चावल्याने मलेरिया आणि डेंग्यू यांचे रुग्ण वाढत आहेत. रात्रभर झोप न झाल्याने नोकरीवर जाणार्या लोकांचे हाल होत आहेत.
विजेच्या मागणीत वाढ झाल्याने केबल जळणे आणि अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. यासंदर्भात दुरुस्तीची कार्यवाही केली जाते, अशी माहिती महावितरणचे ‘मॅफको’ विभागाचे साहाय्यक अभियंता आदित्य धांडे यांनी दिली.
संपादकीय भूमिकानागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणे दुर्दैवी ! |