|
मुंबई – एका मोठ्या व्यक्तीच्या हत्येचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. अंधेरी पश्चिमेला असलेल्या ‘द प्लॅटिनम’ हॉटेलमधून मुंबई पोलिसांनी ५ जणांना अटक केली. हे आरोपी हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार येथून आल्याचे समजते. हे आरोपी २२ ते २७ वर्षे वयोगटातील आहेत.
संबंधिताच्या हत्येच्या कटाचे ते नियोजन करत होते; पण गुन्हे शाखेने त्यांना वेळीच पकडले. त्यांच्याकडून ७ पिस्तुले आणि २१ काडतुसे जप्त केली आहेत. हे गुन्हेगार ज्या राज्यातून आले आहेत, त्या भागातही त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. ज्या मोठ्या व्यक्तीच्या हत्येचा कट रचला होता, तिचे नाव मात्र समोर आलेले नाही.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित मुंबई ! |