तलवारबाजीसाठी गोव्यातून सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग दळवी याची निवड

१७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेसाठी गोव्यातून पर्वरी येथील एल्.डी. सामंत विद्यालयाचा विद्यार्थी, तसेच सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय १३ वर्षे) याची निवड झाली आहे.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या जिल्हा संयोजकांच्या शिबिराचा गोव्यात शुभारंभ !

हिंदूसंघटन आणि हिंदूंची इकोसिस्टम (यंत्रणा) सिद्ध करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न झाले पाहिजे, यावर शिबिरार्थी हिंदुत्वनिष्ठांचे दिशादर्शन करण्यात येत आहे.

वर्ष २०११ मधील ‘उटा’ संघटनेच्या आंदोलनातील जाळपोळ प्रकरणी बरकत अली कह्यात

वर्ष २०११ मध्ये बाळ्ळी येथे झालेल्या ‘उटा’ आंदोलनाच्या वेळी झालेल्या जळीतकांड प्रकरणी विदेशात पसार झालेला संशयित बरकत अली (वय ४७ वर्षे) याला ‘सीबीआय’च्या गोवा विभागाने कह्यात घेतले आहे. वर्ष २०१५ मध्ये तो सौदी अरेबिया येथे पसार झाला होता.

फर्मागुढी (गोवा) येथील आयआयटी संकुलात बाँब ठेवल्याचा खोटा संदेश

फर्मागुढी, फोंडा येथील आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) परिसरात बाँब असल्याची धमकी मिळाल्यानंतर संकुलातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले.

नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमा ! – काँग्रेस

नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सोमवारपर्यंत (१८ नोव्हेंबरपर्यंत) निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग न नेमल्यास राज्यभर आंदोलन करण्याची चेतावणी काँग्रेसने दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी ही चेतावणी दिली.

गोवा : आध्यात्मिक पर्यटनाचे एक अग्रगण्य केंद्र !

‘आध्यात्मिक पर्यटना’चे अग्रगण्य केंद्र म्हणून गोव्यातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या समृद्ध इतिहासाने भारतासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देत आहे.

वेश्याव्यवसाय चालवणारी ७८ संकेतस्थळे गोवा पोलिसांकडून बंद

चित्तोड, आंध्रप्रदेश येथील ५४ वर्षीय सय्यद उस्मान आणि गुडगाव, हरियाणा येथील ३० वर्षीय महंमद मोहेबबुल्ला यांना एस्कॉर्ट संकेतस्थळ तयार केल्याबद्दल आणि वेश्याव्यवसाय जाळे चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

धारगळ येथील स्थानिकांचा ‘सनबर्न’ला विरोध

गोव्यातील अनेक ठिकाणी विरोधाला सामोरे गेल्यानंतर सनबर्नच्या आयोजकांनी त्यांचा ‘इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक (इडीएम्) महोत्सव’ धारगळ येथे हालवण्यात आल्याचे संकेतस्थळावर स्पष्टपणे सूचित केले आहे.

नोकरी घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्याविरुद्ध तक्रार

सावर्डेचे भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्यावर सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याच्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

कुचेली (म्हापसा) येथील सरकारी जागेतील अवैध घरे पाडण्यास प्रारंभ

गोवा शासनाने अवैध घरे उभी रहाण्यास प्रोत्साहन देणारे, तेथील ग्रामपंचायत, त्यांना वीज आणि पाणी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही कारवाई केल्यास असे प्रकार थांबतील !