कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. त्यामुळे सावधानता बाळगून कुटुंबीय आणि मित्रपरिवारांना सावध करावे !

चीनकडून एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धसाहित्य तैनात !

चीन विश्‍वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

यवतमाळ येथे फसवेगिरी करणार्‍यांविरुद्ध तक्रार देण्याचे ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन !

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच खादी आयोग या ३ कार्यालयांच्या वतीने पी.एम्.ई.जी. आणि सी.एम्. ई.जी.पी. या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत विविध उद्योगांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची त्या पोर्टलवर छाननी केली जाते.

एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता सवा पाच कोटी रुपये देयक पाठवणार्‍या पुणे येथील स्पर्श रुग्णालयावर कारवाई करावी !

सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतांना आणि एकाही रुग्णावर उपचार झाले नसतांना हे देयक मागणे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे.

पारनेर येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अपहार, शाखाधिकारी, अध्यक्षांसह १४ जणांविरोधात गुन्हा नोंद

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

उत्तरप्रदेशातील मदरशांना मिळणार्‍या सरकारी निधीतील घोटाळ्याची चौकशी होणार !

मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?

नैसर्गिक मध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता !

मधाविषयीची माहिती, मधातील भेसळ ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान, मधाच्या उत्पादनासाठी भारतातील पोषक वातावरण, मधाच्या उत्पादनाविषयी सरकारची भूमिका यांसारखी उपयुक्त माहितीसाठी वाचा…

गैरव्यवहार केल्याप्रकरणी परभणी येथील ३ पोलीस कर्मचारी निलंबित

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.

नागपूर येथे लंडनमधील कथित मैत्रिणीकडून वृद्ध व्यक्तीस १० लाख रुपयांचा गंडा !

लंडन येथील एक कथित लिडा थॉमसन या मैत्रिणीने येथील एका ६६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. ‘कस्टम ड्युटी’च्या नावाखाली वृद्धाचे १० लाख रुपये ही मैत्रीण आणि तिची टोळी यांनी पळवली.

आयुक्तांच्या नावे खोटे फेसबूक खाते उघडून पैशांची मागणी

केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !