मासेमार महिलेने तमिळ भाषेत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असतांना भाषांतर करतांना तिने कौतुक केल्याचे सांगितले !

काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील ?

सिंगापूर येथील प्राचीन मंदिरातील पुजार्‍याकडून मंदिरातील दागिने गहाण ठेवत मिळालेल्या पैशाचा अपहार

श्री मरिअम्मन या प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी कंदसामी सेनापती यांनी मंदिरातील मौल्यवान दागिने परस्पर गहाण ठेवत मिळालेल्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बारामती (पुणे) येथील ए.टी.एम्.च्या रकमेत ३ कोटींचा अपहार

सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लि. विविध अधिकोशांच्या ए.टी.एम्.मध्ये रक्कम भरण्याचे काम करते. संबंधित ए.टी.एम्.ला खोट्या नोंदी करून कॅश बॅलन्सिंग रिपोर्टमध्ये त्या रकमा दाखवून आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वस्तू आणि सेवाकराची बनावट देयके सादर केल्याप्रकरणी पुण्यातील व्यापार्‍यास अटक !

बनावट देयके करणार्‍यांना कठोर शिक्षा त्वरित झाल्यासच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

पुणे येथील अधिकोषाची २ कोटी ६९ लाखांची फसवणूक करणार्‍या माजी नगरसेवकासह १० जणांवर गुन्हा नोंद !

‘श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेड’च्या विशालनगर, पिंपळे निलख येथील शाखेत बनावट कागदपत्रे सिद्ध करून अधिकोषाची २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत घडली आहे.

रा.स्व. संघाने फसवून श्रीराममंदिरासाठी देणगी घेतल्याचे सांगत केरळमधील काँग्रेसच्या आमदाराचा थयथयाट !

धर्मप्रेमी हिंदू आणि रामभक्त यांच्या भक्तीमुळे आणि त्यागामुळे अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जाईल, त्यासाठी एल्धोस कुन्नाप्ली यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांच्या पैशांची हिंदूंना आवश्यकता नाही !

पुण्यात बनावट लग्ने लावून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्‍या महिलांच्या टोळीस अटक !

समाजाची नीतीमत्ता किती खालावत चालली आहे, हेलक्षात येते !

सामाजिक माध्यमांवरील ओळखीचा अपलाभ घेत पुण्यातील निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक !

सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

शेअर्सच्या व्यवहारात ७०० हून अधिक जणांना ३० कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍यावर गुन्हा नोंद !

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.

‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशातही विक्री, आणखी एका आरोपीला अटक

‘पॉर्न प्रॉडक्शन आस्थापना’ने बनवलेल्या ‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशात विक्री करणार्‍या उमेश कामत याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या ७ झाली आहे.