अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
पारनेर (जिल्हा नगर) – येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ढवळपुरी शाखेत ८ लक्ष ५६ सहस्र २१५ रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र काले यांच्यासह १४ जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारी संस्थेच्या फिरत्या पथकाचे प्रमुख आणि लेखापरीक्षक शिरीष कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. ढवळपुरी शाखेत २०१३-१४ या काळात ठेवतारण कर्जप्रकरण, वाहनतारण कर्ज, बचत खात्यात अल्प रक्कम जमा करणे किंवा जमा नसतांना रक्कम अदा करणे अशा प्रकारे जनतेची फसवणूक करण्यात आली.
२० लाख रुपयांची लाच घेतांना साहाय्यक नगररचनाकार गणेश माने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात
कोल्हापूर – अवसायनातील संस्थेच्या भूमीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी ४५ लाखांची मागणी करून २० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारतांना साहाय्यक रचनाकार गणेश हनमंत माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले. ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कार्यालयात कार्यरत होते. यातील तक्रारदार हे सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत.