
नागपूर – लंडन येथील एक कथित लिडा थॉमसन या मैत्रिणीने येथील एका ६६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. ‘कस्टम ड्युटी’च्या नावाखाली वृद्धाचे १० लाख रुपये ही मैत्रीण आणि तिची टोळी यांनी पळवली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून अन्वेषण चालू केले आहे. या वृद्धाची काही मासांपूर्वी फेसबूकवर या महिलेशी ओळख झाली होती. ‘मी देहली येथे आले असून विमानतळावर अडकले आहे. तिला कस्टम अधिकार्यांनी थांबवल्याची थाप मारली. तिच्याकडे भारतात सेवा कार्यासाठी आणलेले २ कोटी रुपये असल्याने तिला ‘कस्टमवाले १० लाख कस्टम ड्युटी भरल्याविना बाहेर निघू देत नाहीत’, असे तिने वृद्धाला सांगितले. वृद्ध व्यक्तीने ९ लाख ६६ सहस्र रुपये लिडा हिने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवले. त्यांनतर लिडा बेपत्ता झाली.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !