शासनाचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आज मतदान !
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले.
महाराष्ट्र विधानसभेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन ३ जुलैपासून चालू झाले. अधिवेशनासाठी विधानभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै या दिवशी सकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ३ जुलै या दिवशी शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय बंद केले. एकनाथ शिंदे गटाकडून विधीमंडळ सचिवांना याविषयीचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विधानभवनात दुसर्या मजल्यावर असलेले विधीमंडळ पक्ष कार्यालय बंद करण्यात आले.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राज्य स्थापन झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत, अशी हिंदुत्वाला धरून राज्यकारभार करण्याची ग्वाही नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ४ जुलै या दिवशी बहुमत सिद्ध करायचे आहे. तत्पूर्वी ३ जुलै या दिवशी राज्य विधानसभेचे २ दिवसांचे ‘विशेष अधिवेशन’ चालू होणार आहे.
शिवसेनेत बंडखोरी करून ३९ समर्थक आमदारांसह बाहेर पडलेले शिवसेना पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या दिवशी पक्षनेतेपदावरून काढले आहे.
अनेक संत-महात्मे ‘लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगत आहेत. ‘एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री लाभला आहे’, असे हिंदूंना वाटते. त्यांच्याकडून परिवर्तनवादी पावले उचलली गेल्यास संत-महात्म्यांची भविष्यवाणी एक ना एक दिवस खरी ठरेल आणि हिंदूंच्या मनातील हिंदु राष्ट्र साकारले जाईल !
आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. कुणीही येथे मंत्रीपदाच्या आशेने आलेले नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.
‘‘संख्याबळ असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. फडणवीस यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.’’