शासनाचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आज मतदान !

विधान भवन 

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे; मात्र नवीन सरकारने अद्याप बहुमत सिद्ध केलेले नाही. हे बहुमत सिद्ध करण्यासाठी ४ जुलै या दिवशी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मतदान होणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उमेदवार अधिवक्ता राहुल नार्वेकर हे बहुमताने निवडून आले. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक ते बहुमत भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार सहजपणे पूर्ण करेल, अशी सध्याची स्थिती आहे.