हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !

विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी 

मुंबई, ३ जुलै – महाराष्ट्र विधानसभेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन ३ जुलैपासून चालू झाले. अधिवेशनासाठी विधानभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै या दिवशी सकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याचसमवेत विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी आमदार सर्वश्री दीपक केसरकर, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, प्रसाद लाड, डॉ. संजय कुटे यांसह अन्य उपस्थित होते.