विधानभवनातील शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यालयाला टाळे ठोकले !

शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ३ जुलै या दिवशी शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय बंद केले. एकनाथ शिंदे गटाकडून विधीमंडळ सचिवांना याविषयीचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विधानभवनात दुसर्‍या मजल्यावर असलेले विधीमंडळ पक्ष कार्यालय बंद करण्यात आले. यामुळे शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.