दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील ! – प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

बालभारतीचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून पालटत्या काळासह नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘बालभारती’ही पालटत आहे. मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास विलंब लागण्याची शक्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आलेल्या पहाणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पहाणी करण्यात येईल अन् त्या वेळी त्रुटी निघाल्यास त्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येईल.

राज्यातील शाळा, महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्यास अनुमती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे सर्व वर्ग चालू होणार आहेत.

अमेरिकेतील प्राध्यापकाने मुलांना ‘तालिबान आतंकवादी का नाही ?’, या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले !

अमेरिकेतील बुद्धीजिवी जर तालिबानीप्रेमी असतील, तर ते भारतद्वेष्टे नक्कीच असतील, हेही लक्षात घ्या ! अशांचा ‘वैचारिक समाचार’ घेण्यासाठी भारतियांनी सदैव सिद्ध रहाणे आवश्यक !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सामाजिक माध्यमात उलटसुलट चर्चाही चालू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा, अशी मागणी केली आहे.

विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग

प्रभारी कुलपती पदावर राजकीय व्यक्ती नियुक्त करून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप साधण्याचा डाव राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत अशा प्रकारचे विधेयक तात्काळ रहित करण्यात यावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल !

रामनगर (कर्नाटक) येथे ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभे रहाणार

असे संस्कृत विश्‍वविद्यालय प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये असले पाहिजे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार यांनी प्रयत्न करावेत, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

आजपासून इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत ‘ऑनलाईन’ ! – डॉ. शेखर साळकर, जलद कृती समिती

दहावी, अकरावी आणि बारावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असल्याने त्यांना आपापल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे; मात्र लस घेतल्यानंतर ते घरी थांबू शकतात आणि घरूनच ‘ऑनलाईन’ वर्गांना उपस्थित राहू शकतात.

मुंबई आणि नवी मुंबईत १ ली ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद !

शाळा बंद असल्या, तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू रहाणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळांसाठी घेण्यात आला आहे.